अहमदनगर : ‘पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झाले आहे. आता अहमदनगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘भाजपकडून हे सरकार लवकरच पडेल असं बोललं जातं आहे. मात्र, आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही. पाच वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण होतील यामुळेच त्याच्या पुढली पाच वर्ष सुद्धा आमचंच सरकार असेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावाही तनपुरे यांनी केला.