मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडाडीने कामे करत होते मात्र दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते आराम करत होते अखेर आज अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
आजारी असल्यामुळे नुकतच एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील अजित पवार हे अनुपस्थित होते. मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांनी खडसेंशी संवाद साधल्याचे समजून आले होते.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
Read Also
गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी त्यांनी द्यायला हवी होती,भाजपासून CM ठाकरेंच्या भाषणाचा समाचार https://t.co/XFt83vxkny#CMThackarey #BJP #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020