मुंबई : अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तरूंगात जातील असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी केला आहे. मागील काही दिवसापासून शालिनीताई पाटील अजित पवारांवर सातत्याने टिका करीत आहेत. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलंय. आता त्यावर अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी शालिनीताई पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…एकाने आमदारकीसाठी तर दुसऱ्याने खासदारकीसाठी पक्षाला ठोकला रामराम..! पवार अन् संजोग वाघेरेंमुळे ठाकरेंना मिळालं बळ
शालीनीताई यांनी अजित दादावर जे आरोप केले. त्यावर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्या आहेत. आरोप आणि न्यायालयाचे निर्णय हे लोकशाहीतले वास्तव सर्वानी स्विकारयला हवे. वय आणि वास्तव त्यांना माहिती नसल्यामुळे त्या अजित दादावर आरोप करत आहेत. माध्यमाच्या रुपाने का होइना त्या ठणठणीत आहेत, असं दिसतंय. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. असा खोचक टोला सुरज चव्हाण यांनी शालिनीताई पाटील यांना लगावला आहे.
हेही वाचा…गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला कडक इशारा
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील असं बोललं जात आहे. त्यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे देखीली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील. कारण एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. परंतु त्यांना सरकार चालवता येत नाही. असंही त्या म्हणाल्या.
शालीनीताई यांनी अजित दादावर जे आरोप केले त्यावर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्या आहेत.आरोप आणि न्यायालयाचे निर्णय हे लोकशाहीतले वास्तव सर्वानी स्विकारयला हवे.वय आणि वास्तव त्याना माहिती नसल्यामुळे त्या अजित दादावर आरोप करत आहेत.माध्यमाच्या रुपाने का होइना त्या ठणठणीत आहेत असं…
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) December 27, 2023
READ ALSO :
हेही वाचालोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा
हेही वाचाअजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद
हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं