पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप वर टीकेची तोफ डागली. यावेळी त्यांनी भाजपचे गिरीश बापट यांच्यावर पवारांनी निशाणा साधला.
गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षात संबंध असल्यानेच ते आमदार, खासदार म्हणून निवडून येतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांना लगावला आहे.
संवाद पुणे आयोजित ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी गिरीश बापट यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या.आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात, असंही अजित पवार म्हणाले.
प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली. गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. गिरीश बापट भाजपचे खासदार नाही, तर पुणेकरांचे खासदार आहेत. सर्व पक्षात त्यांचे संबंध म्हणून ते आमदार, खासदार म्हणून निवडणूक येतात , असं अजित पवार म्हणाले.
Read Also
तुमचे उपकार न फिटणारे , मोठ्या वादानंतर धनंजय मुंडे झाले भावुक
महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी , राज ठाकरे पुणे दौऱ्यावर