कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. राजकीय नेत्यांची देखील त्यातून सुटका झालेली नाही. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात ऍडमिट आहेत. राज्यात राष्ट्रवादीचे धनंजय मुंढे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे प्रत्येक राजकारणी सक्षमतेने कोरोनाची काळजी घेताना दिसत आहे.
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये अजित पवार स्वतः काम करताना दिसताहेत मात्र चर्चा आहे ती त्यांनी निवडलेल्या सोशल डिस्टंनसिंगची. दादांनी आपल्या समोरील दोन रॉडला थेट लाल पट्टी लावून पुढे नो एंट्री असल्याचे दर्शवले आहे.
एखाद्या मॉलमध्ये रिजर्व्ह जागेसाठी ज्या प्रकारे रिबन लावून आखणी केली जाते अगदी त्याच प्रकारे दादांनी जणू सोशल डिस्टनसिंग करत स्वतः भोवती सुरक्षा कडेच निर्माण केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अजित पवार यांच्या पुढे खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे देखील बसल्याचे दिसत आहेत.
अजित पवार यांची प्रत्येक स्टाईल खूप प्रसिद्ध होते अगदी त्याचप्रमाणे आता हे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे दादा तुम्ही क्वारंटाईन आहेत का ? असा सवाल देखील नेटकऱ्यांकडून विचारला जातोय.