गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही पार्थ पवार यांनी सुशांतसिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत असतानाच पार्थ पवार यांनी भाजपच्या मागणीलाच एक प्रकारे समर्थन करत, महाविकासआघाडीला अडचणीत आणलं.
पार्थ पवार यांच्या मागणीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः व्यक्तव्य केलं आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. असे शरद पवार यांनी वक्तव्य केले होते. त्यावर पार्थ पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार आणि संजय राऊत यांची आज भेट झाली त्या नंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हि प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांच्या या वक्तव्यांनंतर आत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक वर दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर ते पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पवार घराण्यातच राजकीय कुरुबुरी सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्शवभूमीवर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची श्यक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नक्की काय चर्चा होणार? तसेच शरद पवार हे खरचं पार्थ पवार यांच्यावर नाराज आहेत का? पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर या चर्चेत काय तोडगा निघणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं ट्विटही केलं. जय श्रीराम म्हणत पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा देणारं पत्रही लिहिलं. राम मंदिर भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेलाही पार्थ पवार यांनी छेद दिला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगत सारवासारव करावी लागली.