शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा.
तसेच दुसरीकडे आज काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील भाजप सरकार पाडून दाखवावे असे खुलं आव्हान केले होते. तसेच आमचे सरकार स्थिर असून पाच वर्ष पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.
मात्र महाविकासआघाडीतील नेत्यांच्या सरकार पाडून दाखवा या विधानाची भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “पहिल्यांदा बघितले..मुख्यमंत्री सकट सगळे मंत्री सांगत आहेत..आमच सरकार पाडा!!….इतकी घाई कधीच बघितली नाही.”
पहिल्यांदा बघितले..
मुख्यमंत्री सकट सगळे मंत्री सांगत आहेत..
आमच सरकार पाडा!!
इतकी घाई कधीच बघितली नाही..
😅😅😅
— nitesh rane (@NiteshNRane) July 24, 2020