अमरावती : सुरूवातीला मैदानावरून अमरावतीत बच्चू कडू आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात राडा झाल्याचे बघायला मिळाले. मात्र यानंतरही अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. त्यानंतर आता नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी लोकांना पैसे वाटले असा आरोप आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा…“डमी नाही, डॅडी उमेदवार,” , ‘त्या’ टिकेला आढळरावांनी कोल्हेंना दिलं जोरदार प्रत्युत्तर
रोहित पवारांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून काही महिलांना नवनीत राणा यांच्या सभेसाठी अनिल साबळे नावाच्या व्यक्तीनी सातशे रूपये ऐवजी तीनशेच रूपये दिल्याचे दिसत आहेत. त्या महिलांनी देखील याबाबत सांगितलं आहे. तसेच सफेद पाकीटं दिलीत का असा सवाल करत खाकी पाकिट दिलेत असं उत्तरही त्या व्हिडीओत महिलांनी दिलंय. याशिवाय दिलेले पैसे देखील त्या महिलांना काढून दाखवले आहेत.
या व्हिडीओवर सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप. यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात. हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा.. आता एकच मिशन.. ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी असं म्हणत रोहित पवारांनीही नवनीत राणांना डिवचलंय.
दरम्यान, यातच नवनीत राणांच्या सभेला अमित शा येणार होते. त्यामुळे तिथे लाखोंच्या संख्येने लोक आले होते. त्या महिलांना त्याठिकाणी पाणी वाटण्याचे काम दिलं होतं. त्यासाठी त्यांना पैसे दिले होते. अन् तोच व्हिडीओ आता टिव्हीवर दाखवलं जात आहे. असं म्हणत रवी राणा यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तर नवनीत राणा यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच असे प्रकार आता विरोधकांकडून सुरू आहे. असेही ते म्हणाले.
सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप… यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा..
आता एकच मिशन..
ज्यांनी खाल्ली दलाली
त्यांना पाठवू घरी!!! pic.twitter.com/hP9kBXhE78— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2024
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात तिरंगी लढत अटळ, शांतिगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
हेही वाचा..“..त्यामुळेच पुणेकर मला विजयी करतील,” मोहोळांनी सांगितलं पाच वर्षाचं नियोजन
हेही वाचा…“मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहे,” जुन्नरकरांसाठी आढळराव पाटील देणार मोठी भेट
हेही वाचा…“मोदींना गरिबीची जाण, बारामतीतही महायुतीचा उमेदवार विजयी होणार”, रामदास आठवलेंचं वक्तव्य