नाशिक : गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत खलबतं सुरू आहेत. अशातच आज शांतिगीरी महाराज यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीसह महाविकास आघाडीला जोरचा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचा अजूनही उमेदवार ठरलेला नाहीय. अशातच शांतिगीरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल करत ही लढत तिरंगी होण्याच्या वाटेवर असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.
हेही वाचा…शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची संपत्ती किती ? वाचा आकडेवारी
शांतिगीरी महाराज हे नाशिकमधून निवडणुक लढण्यास इच्छूक होते. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. मात्र या भेटीत शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आज शांतिगीरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिकच्या जागेसाठी येत्या २० मे ला मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच महाराजांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत अनेकांना धक्का दिला आहे.
हेही वाचा…अनंत गीतेंच्या विरोधात मतदारांचा प्रचंड रोष, बॅनरबाजी करत गीतेंवर साधला निशाणा
यातच आता शांतिगीरी महाराज यांनी पत्रक जारी करत महायुतीला कडक इशारा दिला आहे. या पत्रकामध्ये १ लाख ८० हजार कुटुंबाच्या भक्तपरिवाराचे सुमारे ४ लाख मतदान फिक्स असल्याचे म्हटलं आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, चांदवड, नगर, संभाजीनगर, यासारख्या अनेक भागातील भक्त प रिवाराचे नाशिकमधील नातेवाईकांचे मतदान आहे. तर जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेल्या १८ पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्तपरिवार आहे. शांतिगीरी महाराज यांची स्वच्छ प्रतिमा आहे. तर खिसे नसलेलं, निस्वार्थ, निष्काम असं ब्रम्हचारी व्यक्तिमहत्व आहे.
याचसह नाशिकसाठी निधी खेचून आणण्याची ताकद असेही त्यांनी म्हटलंय. तर अंतर्गत कलहामुळे अनेक पक्षांचे लोकं आतुन शांतिगीरी महाराज यांचे काम करण्याची शक्यता आहे. अंजनेरी, कुंभमेळा व इतर धार्मिक मुद्यांवर असलेला प्रभाव असा उल्लेख देखील त्यात करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“..त्यामुळेच पुणेकर मला विजयी करतील,” मोहोळांनी सांगितलं पाच वर्षाचं नियोजन
हेही वाचा…“मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहे,” जुन्नरकरांसाठी आढळराव पाटील देणार मोठी भेट
हेही वाचा…“मोदींना गरिबीची जाण, बारामतीतही महायुतीचा उमेदवार विजयी होणार”, रामदास आठवलेंचं वक्तव्य
हेही वाचा…“डमी नाही, डॅडी उमेदवार,” , ‘त्या’ टिकेला आढळरावांनी कोल्हेंना दिलं जोरदार प्रत्युत्तर