अहमदनगर : सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता दक्षिण नगरमधून महायुतीकडून पुन्हा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. अशातच याच मतदारसंघातून निलेश लंके नावाच्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने याठिकाणी मोठा ट्विस्ट निर्माण केलाय. तर निलेश लंके यांनी विखे पाटलांवर जोरदार पलटवार केलाय.
हेही वाचा…“मोदींना गरिबीची जाण, बारामतीतही महायुतीचा उमेदवार विजयी होणार”, रामदास आठवलेंचं वक्तव्य
निलेश लंके यांच्यासह सुजय विखे पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र निवडणुक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके या उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नावसार्धम्यमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नगर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार टिका केलीय. सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो. अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो. पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही. एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी. केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी. असा इशाराही लंकेंनी विखेंना दिलाय.
हेही वाचा…“डमी नाही, डॅडी उमेदवार,” , ‘त्या’ टिकेला आढळरावांनी कोल्हेंना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, अशातच रायगड लोकसभा मतदारसंघातून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या नावाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा नाव असलेल्या एका अपक्ष उमेदवारांनी निवडणुक लढवली होती. त्यावेळी तटकरेंना याचा मोठा फटका बसला होता.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात तिरंगी लढत अटळ, शांतिगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
हेही वाचा..“..त्यामुळेच पुणेकर मला विजयी करतील,” मोहोळांनी सांगितलं पाच वर्षाचं नियोजन
हेही वाचा…“मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहे,” जुन्नरकरांसाठी आढळराव पाटील देणार मोठी भेट