IMPIMP
vijay wadettiwar vijay wadettiwar

“अर्थसंकल्पाला मान्यता नाही, तरी निघाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआर”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी जाहिर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन मतांची पेरणी केली आहे. याचदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  आता महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा..”मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

वडेट्टीवार म्हणाले की, महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित घेतले आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले होते. राज्यात महिलावर अन्याय अत्याचार वाढले. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या. या सगळ्याचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे. गरीब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिला या सरकारला चांगलाच धडा शिकविणार आहेत.

हेही वाचा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा 

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआर काढून या सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. कारण जर अर्थसंकल्पाला अजून मान्यताच नाही तरी देखील हा जीआर काढला गेला. एकमेकांतील कुरघोडी आणि राजकारणापाई हा घाईगडबडीत काढलेला शासन निर्णय आहे. अध्यक्ष महोदयांनी देखील हा शासन निर्णय वाचून दाखविला. त्यांना देखील कायदेशीर बाबींची शहानिशा करणे आवश्यक होते. असंही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान,  राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. परंतु हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतूदींना भूलन जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे. कालच आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेनं खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली. अशी टिका देखील त्यांनी केली.

READ ALSO :

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

हेही वाचा…“जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय” 

हेही वाचा..“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही” 

हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा 

Leave a Reply