मुंबई : ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’, असं म्हणतं मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यापाठोपाठ मुंबईत देखील अॅमेझॉनच्या कार्यालय फोडले होते. या घटनेनंतर अॅमेझॉन नरमले असून, पुढील 7 दिवसात अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने ॲमेझॉनकडे केली होती. मात्र ॲमेझॉनने राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतल्यावर दिंडोशी कोर्टाने या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावच 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले होते.
राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आल्यानंतर संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि मुंबईत ॲमेझॉनच्या कार्यालय-गोदामाची तोडफोड केली होती.
मनसेच्या खळखट्यानंतर आता पुढील सात दिवसांत अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.