IMPIMP

आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना,अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारवर ताशेरे

 

नवीदिल्ली : कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हालाकीची होत चालली आहे यावरून शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे यादरम्यान कोल्हे यांनी केंद्र सरकारडून राज्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संसदेच्या भाषणामध्ये बोलताना खासदार कोल्हे यांनी लक्षद्विपच्या खासदारांचे अभिनंदन केले कारण लक्षद्वीमध्ये एकही कोविड केसेस नाही,मात्र महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोविड रुग्ण असल्याचे खासदारांनी यावेळी सांगितले. अशात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सदैव फिल्डवर असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मात्र १ सप्टेंबर पासून केंद्र सरकारने महाराष्ट्राला देण्यात येणारी पी पी किट सहित इतर आरोग्य विषयक मदत सरकारने बंद केल्याचे निदर्शनास आणून दिली.

महाराष्ट्रातील रहिवासी हे देशाचे नागरिक नाहीत का ? महाराष्ट्रपती केंद्र सरकारचे काही उत्तर दायित्व नाही का ? असा सवाल यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. त्यामुळे सध्या राज्याची परिस्थिती आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी असल्याचे कोल्हे यांनी मराठी म्हण सांगत समजावण्याचा प्रयत्न केला.

केंद्राने राज्याला तात्काळ मेडिकल सुविधा द्याव्यात तसेच ऑक्सिजन निर्मितीच्या मेगा युनिटबाबत विचार केला जावा अशी देखील मागणी यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.