IMPIMP
Amol Mitkari is currently living in the BJP leader's house and is paying Rs 27,000 per month Amol Mitkari is currently living in the BJP leader's house and is paying Rs 27,000 per month

“अमोल मिटकरी सध्या राहतात भाजप नेत्याच्या घरी”; महिन्याला मोजतात 27 हजार

मुंबई :  राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या विविध कारणांमुळे जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने भाजप व अन्य नेत्यांवर टिका टिप्पणी करत आहेत. यातच आता अमोल मिटकरी सध्या भाजपच्याच नेत्याच्या घरी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ते महिन्याला घराचं भाडं देखील देत आहेत.

“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी 

अकोला जिल्ह्यातील कुटासा गावाचे अमोल रामकृष्ण मिटकरी हे पहिल्यांदाच विधान परिषदेचे आमदार झाले आणि ते अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीत राहायला आले. विशेष बाब म्हणजे अमोल मिटकरी राहत असलेले घर हे भाजपचे माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या मालकीचे आहे.  गेल्या एक वर्षापासून अमोल मिटकरी हे आशिष पवित्रकार यांच्या घरात भाडेतत्वावर आहेत.

“पैशाची खेळी करता येत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने तो निर्णय रद्द ठरविला होता” 

आशिष पवित्रकार यांच्या हे घर त्यांच्या काकाच्या नावाने असल्याचं पवित्रकार म्हणाले. या घराचं भाडं २३ हजार रुपये दरमाह अन वीजबिल ४ हजार रूपये असे एकत्रित २७ हजार रुपये मिटकरी यांना दर महिन्याला द्यावे लागतात. पवित्रकार हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटिल यांचे पुतणे आहे. अमोल मिटकरी हे सातत्याने अकोला जिल्ह्यामध्ये विकास कामे करीत आहेत.

“दुसऱ्याच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? राऊतांच्या आरोपावर पाटलांचे स्पष्टीकरण 

अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील अनेक कामांना स्थगिती दिली आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले होते. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की,  शिंदे सरकारकडून अकोला जिल्ह्यातील कामांना स्थगिती . महानगरपालिका अकोला ३ कोटी रुपये, बार्शीटाकळी नगरपंचायत ३ कोटी , तर बाळापुर नगरपरिषद ३ कोटी रू अशा एकूण ९ कोटी रुपयांच्या शेतकरी हिताच्या कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. विकास कामांना स्थगिती देणे हा निर्णय जनतेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे. मागच्या काळात अर्थमंत्री श्री अजितदादा यांनी नगर विकास खात्याला 21000 कोटीचा निधी दिला होता . बंडखोर आमदार शहाजी बापूंना सुद्धा कोट्यावधीचा निधी मिळाला. सत्तेचा ताम्रपट कायमस्वरूपी नसतो. असा देखील इशारा त्यांनी दिला.

Read also