नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७०वा वाढदिवस! जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . अमूलनेही आपल्या स्टाईलने त्यांच्या चित्रांचा एक व्हिडिओ तयार केलाय ज्यात मोदींचे सर्व यशस्वी निर्णय व त्यांचा विजय दाखविण्यात आला आहे.
#Amul wishes the Hon. PM Shri Narendra Modi @narendramodi a very happy 70th birthday! #happybirthdaynarendramodi pic.twitter.com/RaWJnX9xmE
— Amul.coop (@Amul_Coop) September 16, 2020
मोदींचा दुसऱ्यांदा झालेला विजय, स्वच्छ भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, मोदींचे आंतरराष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध, इनक्रिडेबल इंडिया, मोदी-सिवन यांची मिठी असे अनेक प्रसंग अमूलने या व्हिडिओमध्ये साकारले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींना गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत