मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी रविवारी ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. येथे ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली. यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच चिडले. समर्थकांनी नारेबाजी करीत ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली.
हे पण वाचा: मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
रविवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत ईडीने देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली. वडविहिरा येथे कारवाई केल्यानंतर त्याच्या शेतातील दिवाणजी पंकज देशमुखला सोबत घेऊन १०.३० वाजता ईडीचे अधिकारी काटोल येथील निवासस्थानी पोहोचले आणि कारवाई सुरू केली. सकाळी सात वाजतापासून ईडीची कारवाई सुरू होती.
हे पण वाचा: “तरीही सामना मध्ये हेडलाईन येईल “आमचीच लाल आमचीच लाल”
ईडी अनिल देशमुख यांच्या घरी कारवाई करीत असल्याचे समजताच काटोल व ग्रामीण भागाचे शेकडो महिला, पुरुष व कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर एकत्र झाले. समर्थकांनी काळी फीत लावून अनिल देशमुख यांच्या समर्थनात ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पावसातही समर्थक ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, ईडीच्या कारवाईचा निषेध असो, परमवीरसिंह को गिरफ्तार करो, अशी घोषणाबाजी करीत होते.
हे पण वाचा: “लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”
देशमुखांच्या मागे ईडीचा पिडा
अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाही आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या मागे ईडी हात धुऊन लागली आहे. ईडीने देशमुख यांची अंदाजे चार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर रविवारी नागपूर जिल्ह्यातील घरांवर कारवाई केली. यापूर्वी नागपुरातील घरावर ईडीने कारवाई केली होती. तसेच मुंबईतही कारवाई करण्यात आली आहे.