नाशिक : एरंडोल येथील काँग्रेसचे नगरसेवक योगेश महाजन यांची युवक काँग्रेस नाशिक जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन हे एकमेव असे नगरसेवक आहेत जे काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवून नगरसेवक झालेले होते. पक्षाविषयीची त्यांची निष्ठा आणि तरुणांचे संगठन करण्याचे कौशल्य पाहून महाजन यांच्याकडे आता नाशिक शहर जिल्हा सह प्रभारी पदाची जबाबदारी सत्यजित तांबे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोपवली आहे.
माझे संघटन पाहून सत्यजित तांबे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला पात्र होऊन नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी मी कटिबध्दतेने प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक योगेश महाजन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सध्या विद्यार्थी आणि परीक्षा यांचा वाद सुरु असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी राहू असा विश्वास यावेळी बोलताना महाजन यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस केंद्र सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले होते.
हे देखील वाचा