नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाची तिसरी लाठ ओसरु लागली आहे. हळूहळू दिल्ली पूर्वपदावर येत आहे. अशातच, दिल्लीत दिवसला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
With the efforts of the people of Delhi, we have effectively and successfully surpassed the third wave of Corona. Sharing some latest figures | LIVE https://t.co/5srdpYAKDE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 19, 2020
केजरीवाल म्हणाले की, दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारने परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. तिसरी लाट खूप भयंकर होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी 131 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला होता, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगतले.