पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच दोन्ही शिवसेनेमध्ये लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेल्या संजय वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. अशातच संजोग वाघेरे यांच्यासाठी ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. तर आज श्रीरंग बारणे यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभा घेतली. या सभेतून फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली.
हेही वाचा…“सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीराजाने बळीचा बकरा बनवला”
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्याची निवडणुक ही गल्लीची नसून दिल्लीची आहे. परंतु आपल्याकडे जे नेते येतात ते गल्लीतलं भाषण करतात. गद्दार, खोके, बोके त्याच्या पलिकडेच जातच नाहीत. असं म्हणत ज्या बाळासाहेबांनी कॉंग्रेससोबत युती करण्याची वेळ येईल. त्यावळी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करीन म्हटलं होतं. त्याच कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. असा हल्लाबोल देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केला.
हेही वाचा..मतदान केल्यानंतर सुुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, चर्चांना उधाण
शिवसेना सोडून राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे व त्यांना साथ दिलेले बारणे हे गद्दार असल्याची टिका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे ठाकरे हेच खरे गद्दार असून त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मावळ मतदारसंघातील गावकी-भावकीवर देखील मोठं भाष्य केलं. जेव्हा आपण तीन-चार पक्ष म्हणून एकत्रित काम करत असतो. त्यावेळी अनेक वेळा लग्नासारखा मान अपमान चालतो. लग्नात याला खुर्ची दिली का ? त्याला खुर्ची दिली का ? असं चालतं. परंतु आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे. अन् हे लग्न सगळ्यांनी अंगावर घेऊन काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर याठिकाणी एक मोठा विजय होईल. असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला
हेही वाचा..“महायुतीत काम करण्याची मोठी संधी”, बारणेंची आघाडीवर टिका तर महायुतीचं कौतूक