बारामती : अत्यंत चुरशीची होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज सकाळीच अजित पवारांसह सुनेत्रा पवार आणि कुटुबिंयांनी कासेवाडीत मतदान केलं. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यातच मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवार यांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवारांच्या घरी का गेल्या ? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आशा काकींची भेट घ्यायला आली आहे. लहान होते, तेव्हा दोन महिने या घरात मी राहिली आहे. असेही त्या म्हणाल्या. तर सुळे अजित पवारांच्या घरी का गेल्या ? याविषयी तर्कवितर्क लढवते जात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मतदानाच्या दिवशी दत्ता भरणेंचा कार्यकर्त्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा..
हेही वाचा…“हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवतोय”, सुनील तटकरेंनी मोदींचं केलं कौतूक
हेही वाचा..पुण्यात मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार, येत्या १० तारखेला सभा
हेही वाचा..चव्हाण अन् गावितांची माघार, दिंडोरीत पवार अन् भगरे यांच्यात दुरंगी लढत