पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचं भविष्य आज मतदान पेटीत बंद होणार आहेत. अशातच रात्री अनेक राजकीय घडामोडी घडल्या तर आज अजित पवार गटातील आमदार दत्ता भरणे यांचा कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी दत्ता भरणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये दत्ता भरणे हे शिवीगाळ आणि धमकी देतांना दिसत आहेत. यात रोहित पवारांनी म्हटलंय की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापुरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी ते या व्हिडीओत देतात.
विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही. असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवतोय”, सुनील तटकरेंनी मोदींचं केलं कौतूक
हेही वाचा..पुण्यात मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार, येत्या १० तारखेला सभा
हेही वाचा..चव्हाण अन् गावितांची माघार, दिंडोरीत पवार अन् भगरे यांच्यात दुरंगी लढत