मावळ : गेल्या काही दिवसापासून मावळात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचं मोठं आवाहन असणार आहे. यातच एका मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीत असतांना काम करण्याची कोणतीही संधी नव्हती. तर महायुतीत आता कामाला मोठा वाव मिळत असल्याची प्रतिक्रिया बारणे यांनी दिलीय.
हेही वाचा..पुण्यात मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार, येत्या १० तारखेला सभा
2019 साली महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढवली होती. त्यानंतर मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकून विजयी केले. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेससोबत जाण्यासंदर्भात वेगळा निर्णय घेतला. यातच बाळासाहेब ठाकरे एकदा असे बोलले होते की, ज्या वेळेस मला कॉंग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेईल. त्यावेळी मी माझं दुकान बंद करेन. मात्र आम्ही कॉंग्रेसला पुर्णपणे विरोध करणारे बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही काम करत आलो आहे. मतदाराने देखील त्याच विचाराने आम्हाला मत दिली होती.
हेही वाचा..चव्हाण अन् गावितांची माघार, दिंडोरीत पवार अन् भगरे यांच्यात दुरंगी लढत
बाळासाहेबांचा खरा विचार होता तो आता शिंदे साहेब पुढे नते आहेत. खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे असून ४० आमदार आणि खासदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीत असतांना कोणत्याही प्रकारची काम करण्याची संधी नव्हती. यातच मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांना देखील राजकारणाचा पाहिजे तितका अनुभव नव्हता. परंतु दुसऱ्या बाजूला आता महायुतीत एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यावर आता त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम शिंदेंनी केलं आहे. यामध्ये मग शासन आपल्या दारी असेल किंवा इतर अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला आता एकनाथ शिंदे यांचे विचार पटले आहेत. त्यांचे काम पटलं आहे. त्यामुळेच एक लोकांसाठी अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून त्यांची एक प्रचिती झाली आहे. तसा चेहरा समोर आला आहे. सर्वसामान्य माणसाला हवा असणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदे काम करत आहेत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“गड किल्ल्यांचे संवर्धन करणार”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…“सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीराजाने बळीचा बकरा बनवला”
हेही वाचा..मतदान केल्यानंतर सुुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, चर्चांना उधाण
हेही वाचा…मतदानाच्या दिवशी दत्ता भरणेंचा कार्यकर्त्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा..
हेही वाचा…“हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवतोय”, सुनील तटकरेंनी मोदींचं केलं कौतूक