बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील ११ जागांसह देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये बारामतीच्या लढतीकडे सर्वाधिक लक्ष लागलं आहे. तर कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदूर्ग येथेही अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केलीय.
संजय राऊत म्हणाले की, बारामतीमध्ये विक्रमी मताधिक्क्याने सुप्रिया सुळे विजयी होतील. मला सुनेत्रा पवार यांची दया येतेय. त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजाने त्यांना म्हणजेच एका गृहिणीला बळीचा बकरा बनवला. भारतीय जनता पक्ष संपुर्ण देशात दारूण पराभवाच्या छायेत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत. असा इशाराही त्यांनी दिलाय.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीपासून पवार घराण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत राजकीय गणितं बदलली असून पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये लढत होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे. तर आज सकाळीच दोन्ही उमेदवारांनी आपल्या परिवारासह मतदानाचा अधिकार बजावला.
READ ALSO :
हेही वाचा..मतदान केल्यानंतर सुुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, चर्चांना उधाण
हेही वाचा…मतदानाच्या दिवशी दत्ता भरणेंचा कार्यकर्त्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा..
हेही वाचा…“हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवतोय”, सुनील तटकरेंनी मोदींचं केलं कौतूक
हेही वाचा..पुण्यात मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार, येत्या १० तारखेला सभा
हेही वाचा..चव्हाण अन् गावितांची माघार, दिंडोरीत पवार अन् भगरे यांच्यात दुरंगी लढत