पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. तर चौथ्या टप्प्यासाठी आता राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा होतांना दिसत आहेत. यातच काळ मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा पार पडल्या. सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत सभा घेतली. त्यानंतर त्यांची पनवेल येथे जाहीर सभा झाली. या सभेत श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड कुठून मिळणार ? याबाबत बोलतांना त्यांनी थेट आकडेवारीच मांडली.
हेही वाचा…“हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवतोय”, सुनील तटकरेंनी मोदींचं केलं कौतूक
सध्याची निवडणुक ही देशाची आहे. महानगरपालिकेची नाही. त्यामुळे एका बाजूला विकासपुरूष असलेल्या मोदींना निवडून द्या. महायुतीला विजयी करा. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २८ पक्षांची खिचडी तयार झाली आहे. महायुतीची गाडी ही विकासाची मेट्रो आहे. याचे इंजिन मोदी आहेत. सर्व जातीच्या लोकांना गाडीत बसवून विकासाकडे जात आहेत. दुसरीकडे रेल्वे गाडीला फक्त इंजिन आहेत. डबे नाहीत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण गाडीचे जण इंजिन बनत आहे. त्यामुळे जो तो आपल्याला हवे त्या दिशेने इंजिन घेऊन जाणार आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड पनवेल विधानसभा मतदारसंघातून मिळणार. अशी शक्यता देखील फडणवीस यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..पुण्यात मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार, येत्या १० तारखेला सभा
दुसऱ्या बाजूला इंजिनमध्ये फक्त दोघांना बसायला जागा आहे. ठाकरे, पवार, गांधींनी स्वत: च्या परिवाराची सोय केली. मोदींनी २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, घरे दिली, गॅस दिला. मुद्रा लोन दिले. ६१ कोटी लोकांना १० लाखापर्यंत कर्ज मुद्रा लोनने दिले. यातील ३१ कोटी महिला आहेत. बचत गटाचा मोठा सहभाग आहे. १० कोटी महिलांना लखपती बनविण्याचे काम मोदी करणार आहेत. महिलांना मुख्य धारेत आणले आहे. यापुढे ३३ टक्के आमदार आणि खासदार महिला असतील. अनुसुचित जाती, आदिवासी समाज, १२ बुलतेदारांचा विचार केला. यासाठी १४ हजार कोटींची योजना आणली असल्याचेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“महायुतीत काम करण्याची मोठी संधी”, बारणेंची आघाडीवर टिका तर महायुतीचं कौतूक
हेही वाचा..“गड किल्ल्यांचे संवर्धन करणार”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…“सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीराजाने बळीचा बकरा बनवला”
हेही वाचा..मतदान केल्यानंतर सुुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, चर्चांना उधाण
हेही वाचा…मतदानाच्या दिवशी दत्ता भरणेंचा कार्यकर्त्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा..