IMPIMP
ashok chavan ashok chavan

‘अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा ‘मेट्रो कारनामे’, आशिष शेलारांचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

मुंबई : काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर या जागेवर राज्य सरकार आणि केंद्राकडून देखील दावा ठोकण्यात आला होता. यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांच्यानुसार, गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील 500 एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या 100 एकर जमीनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे.

मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने 16 एप्रिल 2016ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केलाय. इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या “सातबारा” आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना?, असा सवाल देखील त्यांनी विचारला.

कांजुरमार्गच्या जागेचा निर्णय घेताय तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय? असा सवाल त्याचवेळी आम्ही केला. तेच खरे ठरतेय. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा “मेट्रो कारनामे!, असा टोला शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.