IMPIMP

भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

अकोला  : अकोला जिल्ह्यातल्या उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातरून इथल्या भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात सुभाष अग्रवाल जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी हातरुनला साप्ताइक बाजार होता. त्या दरम्यान ही घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजताच्या सुमारास सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकलमध्ये बसले होते. यावेळी दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण करत चाकूच्या धाकावर अंदाजे 20 हजार रुपये लुटून नेले. या मारहाणीमध्ये अग्रवाल हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

सुभाष अग्रवाल हे घटना घडताच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता आता नाही तर सकाळी तक्रार नोंदवू असं उत्तर पोलिसांनी दिलं. वेळीच तक्रार न घेतल्यामुळे आरोपी मोकाट फिरत असून शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.