मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही मुलाखत घेण्यात आली आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरिक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला आहे. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते मुख्यमंत्री आहेत की माफिया ? असा सवाल केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो आज संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला. यावरून आता भातखळकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया?, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया??? #सामना_मुलाखत_प्रोमो pic.twitter.com/DNfcL6eXSJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 26, 2020
अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीच्या प्रोमोमधील भाषा ही केवळ दुर्देवी नसून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दात पाडणे, सुडाचं राजकारण, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातील आहे.
म्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. राज्याच्या सुव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष द्यावं, भाजपला धमक्या देण्याच्या प्रयत्न त्यांनी करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.