पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा 1992 साली पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
#BabriMasjid thi, hai aur rahegi inshallah #BabriZindaHai pic.twitter.com/RIhWyUjcYT
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 5, 2020
असदुद्दीन ओवेसी ट्विट केले की, बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इंशाल्लाह, बाबरी जिंवत आहे. सोबतच ओवेसी यांनी दोन फोटो देखील शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये जुनी बाबरी मशिद दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये बाबरी मशिदीचा ढाचा पाडणारे कारसेवक दिसत आहेत.
याआधी देखील ओवेसी यांनी राम मंदिर भूमिपूजनाला पंतप्रधान उपस्थित असल्याने विरोध केला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणे हे पंतप्रधानांच्या घटनात्मक शपथेचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.