IMPIMP
Beating up the Santre family for land grab, this is the fun of power Beating up the Santre family for land grab, this is the fun of power

दानवेंच्या कार्यकर्त्यांनी कुंभार कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप :जमिनीसाठी घर पाडले, संसार उघड्यावर; वडेट्टीवार पीडितांच्या भेटीला

जालना : भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे. मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते. गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातो, मारहाण केली जाते.  भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

पुढे बोलतांना ते म्हणाले की,  जवखेडा गाव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचा आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या गुंड कार्यकर्त्यांना आता कंटाळला आहे. मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी त्यांच्यावर केला आहे. जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उध्वस्थ केले असा, आरोप पीडित संत्रे कुटूंबानी केला आहे.

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन 

अज्ञात आठ ते दहा जणांनानी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्थ केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटूंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्त केल्या प्रकारणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही. अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केलीय.

दरम्यान,  हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे. आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..1 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरांचा बळी ! काँग्रेस सरकार पाडण्यासाठी काळी जादू 

हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय 

हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम 

हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?” 

हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा