बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने काल राज्यात कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील परळीत एका कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदाच्या हस्ते 81 किलोचा केक कापण्यात आला. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर केकखाण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरक्षा झुंबड उडाली.
परळी येथील शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर केक खाण्यावरून स्टेजवरच मोठ्या प्रमाणात गोंधळ. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात 81 किलोचा केक कापण्यात आला. कार्यक्रमानंतर हा केक खाण्यासाठी झुंबड उडाली शेवटी पोलिसांना या गर्दीला हटवलं pic.twitter.com/sFrAATx2qR
— Ganesh Thakur (@7_ganesh) December 12, 2020
धनंजय मुंडे यांनी रद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाढदिवसाचा केक कापल्यानंतर केक खाण्यासाठी तरूण अक्षरक्षा तुटून पडले. केक खाण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की देखील सुरू झाली. तर लहान मुलांनी एकमेकांना केक देखील फेकून मारण्यास सुरुवात केली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच, संयोजकांना मध्यस्थी केली व परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी पोलिसांना सौम्या लाठीचार्ज देखील करावा लागला.