कोलकाता : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी पक्षनेतृत्वाशी असलेल्या मतभेदातून राजीनामा दिला होता. ते राज्याचे परिवहन मंत्री होते. त्यानंतर त्यांनी आमदारकी पाठोपाठ पक्षाच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. राजीनामा देण्याचा हा फॉर्मेट चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच २१ डिसेंबर रोजी सुवेंदु अधिकारी यांना बोलावून स्वत: राजीनामा सोपवण्यास अध्यक्षांनी सांगितलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. बंगालच्या राजकारणात वजनदार समजले जाणारे तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीपाठोपाठ पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.
त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला.
एकूण ३५-४० विधानसभा क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांच्यासाठी, तसेच इतर अनेकांसाठी भारतीय जनता पक्षाची दारे खुली आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सुवेंदु अधिकारी यांच्या पश्चिम बंगाल मंत्रिमंडळातील राजीनाम्यानंतर काही तासांतच व्यक्त करण्यात आली होती.
Read Also :
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” संजय राऊतांना खरमरीत पत्र
‘लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची’