IMPIMP
Bhujbal should have spoken harshly to the Ajat Pawar group Bhujbal should have spoken harshly to the Ajat Pawar group

“भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते”, अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. मात्र चुक लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली. यावरून भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं. तर अजित पवार गटाने देखील आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावरून अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली तर हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं.

हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा 

भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने महाडला गेले. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. त्यावेळी त्यांनी न बघताच ते चित्र फाडले. आव्हाडांनंतर त्यांचे अनुकरण इतरांनी केले. पण त्यांनी माफीही मागितली. मुळ मुद्दा जो आहे आम्हाला मनस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि आव्हाड आव्हाड असेच सुरू राहिल असे भुजबळांनी म्हटलं.

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडले हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे विधान भुजबळ यांनी केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते.  त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवे होते. या शब्दात मुश्रीफांनी त्यांच्यावर टिका केलीय.

READ ALSO :

हेही वाचा…दानवेंच्या कार्यकर्त्यांनी कुंभार कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप :जमिनीसाठी घर पाडले, संसार उघड्यावर; वडेट्टीवार पीडितांच्या भेटीला 

हेही वाचा..1 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरांचा बळी ! काँग्रेस सरकार पाडण्यासाठी काळी जादू 

हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय 

हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम 

हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?”