मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे पण वाचा: ईडीच्या कारवाईनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; देशमुख म्हणतात…
अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल ८ ते ९तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.
हे पण वाचा: अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हे पण वाचा: भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
बार मालकांचे जबाब नोंदवले
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील १० ते १२ बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. १० ते १२ मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून काल दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.
Enforcement Directorate (ED) recorded statement of Sachin Waze in Taloja jail in connection with corruption charges leveled on Anil Deshmukh by former Mumbai Police Commissioner Param Bir Singh: ED
— ANI (@ANI) June 25, 2021
दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.