मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील, जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले असून, त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून, देशमुखांच्या चौकशी सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
आज सकाळी ईडीने देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली असून, ५ अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. दरम्यान, ईडीकडून नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना, ईडीच्या दुसऱ्य़ा पथकाने वरळीच्या सुखदा इमारतीतील घरावरही छापा टाकला आला असून, आता त्याही घराची झाडाझडती सुरु असल्याचे कळत आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
दरम्यान, यावरून आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आणि खासकरून राष्ट्रवादीने या कारवाईचा जोरदार निषेध नोंदवला असून, त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यातच आता या कारवाईबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, “ही सगळी चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे, याचा कुठलाही दुसरा आणि वेगळा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
तसेच, “उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे, या संदर्भातील सगळी चौकशी सीबीआकडे सोपवली असून, त्यामुळे उच्च न्यायालयाने निर्देशीत केल्याप्रमाणे ही सगळी चौकशी सुरू आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक त्यावर बोलण्याचं कारण नाही.” असं सांगत त्यांनी कारवाईचं एकप्रकरे समर्थन केलं आहे.
Read Also :
- मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
- “जनतेवर अन्याय करून, कोणताही विकास करता येणार नाही”- प्रविण दरेकर
- “मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर यांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी”
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी