मुंबई: शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा सरकार वर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी रवानगी जेल मध्ये होईल असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते.
काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 25, 2021
दरम्यान, यांनतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत आघाडी आणि शिवसेना नेत्यांच्या घॊटाळेबाजीचा पाढाच वाचला असून, “देशमुख यांच्यासारखीच सीबीआय चौकशी, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रवींद्र वायकर यांनी अनधिकृतपणे बांधलेल्या बंगल्यांची व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये देखील उपस्थित होते.
इथे पहा – किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद
“मिलिंद नार्वेकर यांनी, अनिल परब यांच्या घरापासून काही फुटांच्या अंतरावर, पर्यावरणाचे नियम तोडून आणि अनधिकृतपणे बंगल्याचे बांधकाम केले असून, याची किंमत १० कोटी रुपये आहे. याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहमती असून, खोट्या कायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन, ही बांधकामे लॉकडाऊनच्या काळात केली गेली आहेत,” असे गंभीर आरोप करत त्यांनी, “शिवसेना ही ‘बंगलो पार्टी’ झाली असल्याचा दावा केला आहे.
अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमया यांचे ट्विट
“कोकण किनारपट्टीच्या दापोली-मुरुड भागात अनिल पराब-मिलिंद नार्वेकर आणि दापोली-अलिबाग(मुरुड) भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अनधिकृत बंगले असून, सगळे मिळून एकूण १९ अनधिकृत बंगले आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्री गप्प का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्याप्रमाणे अनिल देशमुख देखील ३-४ वर्षांसाठी जेलमध्ये जाणार असून, राज्यातील जनता त्याचीच वाट पाहत आहे. त्यानंतर अनिल परब यांचा क्रमांक आहे,” असं म्हटलं आहे.
Read Also :
- सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत
- अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी