नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा, अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमया यांचे ट्विट
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.
हे पण वाचा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी
दरम्यान, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हे पण वाचा, “2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”
यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रथमच भूमिका जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, “सीबीआय चौकशीत देशमुखांच्या विरुद्ध काही सापडत नाहीये, म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीची प्रकरणं बाहेर काढून, एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची, मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यात किती तथ्य असावं याचं उत्तर मिळतं. त्यामुळे, केंद्रीय यंत्रणांचा अयोग्य वापर केला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
Maharashtra: Enforcement Directorate (ED) raids former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's residence in Nagpur, in connection with an alleged money laundering case.
Visuals from outside his residence. pic.twitter.com/PD69rBSOsv
— ANI (@ANI) June 25, 2021
तसेच, “एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा गैरवापर, हे भाजप स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. मी आजपर्यंत देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणांचा गैरवापर आपल्या विरोधकांच्या विरोधात केलेला पाहिलेला नाही. देशात नेहमी विचारांचं राजकारण झालं आहे. जे काही विरोध होतात, मतभेद होते ते वैचारिक होते,” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटलं आहे.
Read Also :
- राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही?
- काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?
- एरव्ही मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहचणारे महापौर मोहोळ कोठे आहेत?
- गुलाबराव पाटील वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे; रक्षा खडसे म्हणतात….
- प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर टीका