नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा: एरव्ही मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहचणारे महापौर मोहोळ कोठे आहेत?
हे पण वाचा: राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.
हे पण वाचा: आंबिल ओढ्यातील एकालाही बेघर होऊ देणार नाही; महापौर मुरली मोहोळ यांचे स्पष्टीकरण
हे पण वाचा:परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव
यापूर्वी सीबीआयकडून १० ठिकाणी छापे
दरम्यान, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.