मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, दर महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
यांनतर, या प्रकरणात अनेक चढउतार येऊन गेले. मात्र, आता याला विरोधी पक्ष अजून एक मोठे वळण देण्याच्या तयारीत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार असल्याची शक्यता सांगोतली जात आहे. सोबतच, शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांच्याही चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
दरम्यान, गृहमंत्र्यांच्यावर केलेल्या वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर देखील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने, वसुलीचा आरोप केला आहे. त्यामुळे तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी आज कार्यकारिणीने केली आहे.
हे पण वाचा, पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
या कार्यकारिणीत, येत्या विधिमंडळाच्या २ दिवसीय अधिवेशनात, ठाकरे सरकारविरूद्ध आक्रमक पवित्रा घेत, काही मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असून, आता अजित पवारांना देखील टार्गेट केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावेळीही कार्यकारिणीची बैठक ऑनलाईन पद्धतीनं होणार असून, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Read Also :
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
- अजितदादा आणि बाळासाहेब थोरात अगस्ती साखर कारखाना चालविण्यास घेणार, असे मी म्हटलोच नाही