पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. परंतू, पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र या कारवाई प्रकरणी सरळ हात वर केले आहेत.
हे पण वाचा, पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने थेट पाडकामाला सुरुवात केली, असा आरोप स्थानिकांचा आहे. तर आधी नोटीस देऊनच ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारची कारवाई नियमानुसार आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे. परंतू, या कारवाईशी आमचा काही एक संबंध नाही, असे म्हणत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्रासपणे हात झटकले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
तसेच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
Read Also :
- नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ; माजी मंत्री संजय कुटे म्हणतात…
- विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष पदासाठी आमदार प्रणिती शिंदेंसाठी मुंबईत जोरदार लॉबिंग
- कामचुकार, फसवे मंत्री विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा – चित्रा वाघ