सोलापूर: नुकतीच साई संस्थान अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते . राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली असताना अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्यानावावर शिक्कामोर्तब झालेले आहे. महामंडळ वाटपात आणखी एका देवस्थानाची चर्चा होती ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे दैवत असलेले विठ्ठल-रुख्मिणी मंदिर. महामंडळ वाटपात पंढरपूरचे विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे पद काँग्रेस पक्षाकडे दिले आहे आणि आता मंदिर समितीचा अध्यक्ष देखील काँग्रेस पक्षाचा होणार आहे.
हे पण वाचा, संजय शिंदेंची महापालिका राजकारणातील ढवळाढवळ प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी
काँग्रेस पक्षतील काही नेत्यांकडून पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरु करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. शिंदे कुटुंबीय हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून कोणतेही काम करण्यासाठी ते आधी विठ्ठलाचे दर्शन घेतात तसेच सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंढरपूरला खूप मोठा निधी दिला होता.
हे पण वाचा, प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
हे पण वाचा, सोलापूर : खासदार स्वामींचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, प्रणिती शिंदे मदतीसाठी आल्या पुढे
यापूर्वीच्या काळात आघाडीचे सरकार असताना काँग्रेस पक्षाकडे शिर्डी संस्थानाची जबाबदारी असायची आणि पंढरपूर देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याचे मात्र आता यावेळी उलटे झाले आहे. काँग्रेसकडे विठ्ठल मंदिर समिती आल्यामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. विठ्ठल मंदिर समितीची उलाढाल जवळपास ३५ कोटींच्या आसपास असली तरी विठूरायाच्या दर्शनाला दर वर्षी कोटींच्या घरात भाविक दर्शनाला येत असल्याने देवस्थान ताब्यात येणे काँग्रेसला महत्वाचे वाटते आहे. अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच कळणार आहे.
हे पण वाचा,
देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे: माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
पंढरपूरनंतर आता अजून एका जागेसाठी होणार विधानसभा पोटनिवडणूक
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
पंढरपूरनंतर आता अजून एका जागेसाठी होणार विधानसभा पोटनिवडणूक