मुंबई : राज्यात नुकतीच पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीचा गुलाल उधळला गेला असून, महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला.
दरम्यान, या निवडणुकीनंतर राज्यात अजून एका ठिकाणी विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असून, इथे देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तगडा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नांदेडच्या देगलूर येथील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं १० एप्रिलला महामारीमुळे निधन झालं.
त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. सध्या ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र या जागेवर याआधी २ वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या सुभाष भोसले यांनी देखील पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पालघर प्रमाणे शिवसेनेने ही जागा काँग्रेसकडून घ्यावी. पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होऊ देऊ नये, अन्यथा बंड करत भाजपमध्ये जाण्याचा थेट इशारा दिला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसकडून या जागेसाठी दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे पंढरपूर निवडणुकीच्या निकालाचीच पुनरावृत्ती पाहायला मिळणार की अजून काही वेगळाच निकाल लागणार हे येत्या काही दिवसात कळेलच.
Read Also :
- प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण