रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. या शासनाने जनहिताचे एकही काम केलेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत व बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत. दररोज विधाने बदलत आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची दिशाभुल करणाऱ्या फसव्या कामचुकार मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताबडतोब राजीनामा घेत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
हे पण वाचा, क्या हुआ, तेरा वादा.. जयंतरावजी…; चित्रा वाघकडून जुन्या आठवणींना उजाळा
रत्नागिरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ्ॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, महिला मोर्चा अध्यक्ष प्राजक्ता रुमडे, सरचिटणीस राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणासाठी भाजप महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. आज शासकीय विश्रामगृहात ही परिषद झाली.
हे पण वाचा, ‘…तिथे खाकीचा जोर दाखवा’, ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या
या वेळी वाघ म्हणाल्या की, आरक्षण रद्द झाले ते या नाकर्त्या सरकारमुळेच. न्यायालयाने १५ महिने दिलेले असूनही मागासवर्ग आयोग गठित केला नाही. डाटा दिला नाही. यात सरकारने जराही स्वारस्य दाखवले नाही. सत्तेतले मंत्रीच चिंतन बैठका घेत आहेत, आंदोलन करत आहेत. कसले आणि कोणाविरुद्ध करत आहेत. आयोग करण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे धुळ खात पडली होती. सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन आयोग गठित करायला हवा होता, असे त्या म्हणाल्या.
हे पण वाचा, “नुसता गोधळ झालाय” जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास सक्तीचा केल्याने चित्रा वाघ आक्रमक
ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी आयोग गठित करतो, असे सांगितले. ५ दिवसांपूर्वी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे जाहीर केले. परंतु आता कालच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या सरकारला ओबीसींचे आरक्षण काढूनच घ्यायचे. फसवे, कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.
Read Also :
- “मुख्यमंत्र्यांचा दृष्टीकोन एक नेता म्हणून वाखाणण्याजोगा”- जितेंद्र आव्हाड
- मोदींची ही अशी बनवाबनवी; सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे ‘हे’ खळबळजनक रहस्य
- “अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले
- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे
- आघाडी सरकरमधल्या आणखी एका पक्षाने केली स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर