मुंबई : जालन्यात पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची सांगितले जात आहे. आता या घटनेवरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. आता यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
वाह रे बहाद्दर…..@sp_jalna
४/४ जण मिळून लाथाबुक्के दांडुक्याने एकाला हॉस्पिटल मध्ये मारताहेत…
कोरोनामहामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत लोकांचे खुन होताहेत तिथे दाखवा खाकीचा ज़ोर…गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय ???@DGPMaharashtra @maharashtra_hmo pic.twitter.com/GXmSfuVGVV
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 27, 2021
कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत. लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा जोर. गोरगरिबांवर जोर काढून काय साध्य करताय ?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ 9 एप्रिलचा असल्याचे सांगितले जात आहे. दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती. रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे.
Read Also :
- आयर्न मॅन ला एवढा राग का येतोय; कृष्ण प्रकाश यांची राष्ट्रवादीसोबत सेटलमेंट?
- ‘आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत, जनता मात्र हालात बेहोश’
- ‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत’
- ‘सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा’
- … त्यामुळे चंद्रपुरमधील दारु बंदी उठवली, वडेट्टीवारांनी सांगितले कारण