नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा सध्या शिंदे गटाकडे असला तरी या ठिकाणी सुरुवातीपासून अजित पवार गट आणि भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपली स्वतःची उमेदवारी अगोदरच जाहीर केल्याने या ठिकाणी मोठा पे; निर्माण झालाय. यातच आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तीन मे हा शेवटचा दिवस आहे. यातच आज भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नाशिक लोकसभेचा उमेदवार लवकरच घोषित करू, असं गिरीश महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा….“सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ती..,” शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघासाठी आज महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. यातच आघाडीतील प्रमुख पदाधिकारी तसेच काही कार्यकर्त्यांसोबत येणाऱ्या निवडणुकी संदर्भात नियोजन केलं. त्यामुळे ही निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी असल्याने नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आमचाच उमेदवार विजयी होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 च स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू. असं गिरीश गिरीश महाजन यांनी म्हटले.
हेही वाचा…“आज भारत जगाला मदत करतो, कुणाकडून भीक मागत नाही”, मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
उमेदवारी कुणालाही दिली तरी कोणीही नाराज होणार नाही. शेवटी आम्ही महायुतीत असल्याने कुणाला तरी ही जागा सुटणार आहे. येत्या ३ मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधीच दोन किंवा उद्या उमेदवाराची घोषणा केली आहे. उमेदवारी उशिरा घोषीत झाली तरी त्यासंदर्भात आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. युद्ध भूमीवर जशी तयारी असते. तशी आमची राजकारणातही तयार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना याची चिंता करू नये. असेही गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगीरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची देखील भेट गिरीश महाजन यांनी घेतली आहे. परंतु ही भेट निष्फळ ठरल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन यांची अजय बोरस्ते यांनी देखील चर्चा केली असून बोरस्ते हे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून याठिकाणी कुणाला उमेदवारी जाहीर होईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला, आताच तर इतकं, तर खासदार झाल्यात तर काय होईल विचार करा,”
हेही वाचा…“आढळरावांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला”
हेही वाचा…“आढळरावांच्या भव्य रॅलीला हडपसरमधील हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद”