मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती हे विविध राजकीय पक्षातील नेत्यांची भेट घेत आहे. यातच संभाजीराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली. या भेटीनंतर ‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत’, असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.
या भेटीनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात.
माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नातं छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा’
- … त्यामुळे चंद्रपुरमधील दारु बंदी उठवली, वडेट्टीवारांनी सांगितले कारण
- ‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं?’
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा