मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितल जात आहे.
शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.
बुधवारी सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, लॉकडाऊन, तौक्ते चक्रीवादळ, तसेच मंत्रीमंडळात खडाजंगी झाल्याचे देखील समोर आले होते. मात्र, या बैठकीतील अधिकृत चर्चेबाबत माहिती समोर आलेली नाही.
Read Also :