ठाणे : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर छापा टाकल्याचं समोर आलं होतं. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या’, अशी विनंतीच थेट पोलीस आयुक्तांना केली आहे.
तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झाले? कोणी किडनॅप केले? याची भिती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेत केली.
किरीट सोमय्या यांच्यासोबतच ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे देखील पोलीस आयुक्तांच्या भेटीवेळी होते.
ईडीकडून सातत्याने सरनाईक यांच्या संपत्तीवर छापेमारी सुरू आहे. यातच गेल्या अनेक दिवसांपासून ते गायब असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता सरनाईक हरवले आहेत, त्यांचं काय झालं, कोणी किडनॅप केलं?, असे म्हणत सोमय्या यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी तक्रार दिली आहे.
Read Also :
- PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला ‘या’ देशात अटक
- ‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो’
- ‘इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो’
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र
- बुलढाण्यातील 138 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नसल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र परिस्थिती वेगळीच