नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आले आहे. मेहुल चोक्सी याला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अटक केली आहे. रविवारी चोक्सीने अॅंटिग्वामधून पळ काढला होता.
पंजाब नॅशनल बँकेच्या १४००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी मुख्य आरोपी पैकी एक आहे. मेहुल चोक्सी सध्या डॉमनिका पोलिसांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंटच्या (सीआयडी) कस्टडीमध्ये आहे. मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.
Fugitive diamantaire Mehul Choksi is in the custody of the Criminal Investigation Department (CID) in Dominica, reports Antigua media
(file pic) pic.twitter.com/ofd8UQxKZb
— ANI (@ANI) May 26, 2021
नीरव मोदी आणि मेहुल विरोधात इंटरपोलने भारताच्या मागणीनंतर रेड कॉर्नर नोटीस काढली होती. या नोटीस आधारेच नीरवला इंग्लंडमध्ये अटक झाली. पण मेहुल चोक्सी जेलबाहेर राहण्यात यशस्वी ठरला होता. अँटिग्वातून फरार झाल्यानंतर आता त्याला डॉमिनिकामध्ये अटक करण्यता आली आहे.
दरम्यान, पीएनबी घोटाळ्यात मेहूल चोकसी आणि नीरव मोदी हे मुख्य आरोपी आहेत. घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८ मध्ये मेहुल चोक्सी, नीरव मोदी हे भारतातून फरार झाले होते.
Read Also :
- ‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो’
- ‘इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो’
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र
- बुलढाण्यातील 138 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नसल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र परिस्थिती वेगळीच
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण