मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा कर्जत येथील कोविड सेंटर्समध्ये कोरोनारुग्णांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. शरद पवारांचे नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय आहे का ? असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे.
रोहित पवार यांनी कर्जत येथील एका कोविड सेंटर्सला भेट दिली होती. येथे रुग्णांचे मनोबल वाढावे यासाठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रोहित पवारांनी देखील झिंगाट गाण्यावर रुग्णांवर ठेका धरला. यावरून रोहित पवारांवर टीका होत आहे.
कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये @RRPSpeaks यांना नाचायची परवानगी आहे?
वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत.https://t.co/UtxQQHt8MM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 25, 2021
कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
याआधी प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले. रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का?, असा सवाल त्यांनी विचारला.
Read Also :
- बुलढाण्यातील 138 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नसल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र परिस्थिती वेगळीच
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- कोरोनामुक्तीचा हिरवे बाजार पॅटर्न, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सीरम इंस्टिट्यूटची थेट पुणे शहराला लस देण्याची तयारी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती