पुणे : पुणे शहरातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे लसीकरणावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात शहरातील लसीकरण मंदावले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्यावतीने थेट शहराला लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लस उत्पादन कंपनी सीरम इंस्टिट्यूटला करण्यात आली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सीरम इंस्टिट्यूट पुण्यात आहे. येथे उत्पादन करण्यात आलेल्या एकूण लसीच्या 50 टक्के केंद्र सरकार, 25 टक्के राज्य सरकार आणि 25 टक्के खासगी हॉस्पिटल्सला दिले जात आहे. पुण्यातील लसीकरण पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य आहे. केंद्र व राज्याला पुरवठा केल्यानंतर शहराला मिळणारी लस ही अनियमित आहे.
सगळ्या गोष्टीचा विचार करून सीरमला विनंती केली आहे की, या शहरात लसीचे उत्पादन होत असल्याने थेट लसीचा पुरवठा करता येईल का ? यासंदर्भात 2-3 वेळा बैठक झाली आहे. सीरम इंस्टिट्यूट पुणे शहराला लस देण्यास तयार आहे. परंतु, केंद्र सरकारने परवानगी दिली तर लस देण्यास तयार असल्याचे देखील सीरमने पत्र दिले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे. ग्लोबल टेंडर देखील लवकरच काढत आहोत, अशी माहिती महापौरांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने 18 जिल्ह्यातील होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी हा निर्णय अव्यवहार्य असून याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सरकारला केली आहे.
Read Also :
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
- तरुणाची गांधीगिरी, रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलविरोधात केले ‘अर्धनग्न’ आंदोलन
- ‘गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा’
- ‘…अन्यथा लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही झुगारुन दुकानं सुरु करु’
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’